सोमवार, मई 02, 2022

काळी_बायको_का_नको



काळी_बायको_का_नको? गोऱ्या बायकोत असे काय विशेष असते..? तर पहा संपूर्ण लेख


नमस्कार मित्रांनो, कालच माझ्या इनबोक्स मध्ये माझ्या एका प्रेमळ मित्राचा मेसेज आला त्याने मला प्रश्न विचारला की त्याला एक स्थळ सांगून आले आहे, पण मुलगी काळ्या वर्णाची आहे. मला सांग मी काय करू? मी द्विधामनःस्थितीत आहे. मला लग्न तर करायचे आहे. मी काल घरी निघण्याच्या घाईत हा प्रश्न आला होता. मी त्याला सागितले, ही तुझी खाजगी बाब आहे.. तूच काय तो निर्णय घे.

पण नाही तो ऐकतच नव्हता.. आताच सांग. मी अशा प्रश्नाची लगेच उत्तर देत नाही.. सांगितले उद्या विचार करून सांगतो. पण सांगतो म्हणून मी वेळ मागितली होती पण नंतर ह्या प्रश्नाने माझे २-३ तास खर्ची घातले कारण आज हा एक सा माजिक प्रश्न होता. नुसता टाळून चालणारा नव्हता.

आज मी त्याला फोन करून सांगितले.. कर बिनधास्त… काही काळजी नसावी. कारण सध्याच्या तरूणांना बायको सुंदर हवी…गोरी हवी… आणि हुशारही हवी असेच वाटते. जग बदललं पण बाहेरील सौंदर्याची पूजा करणारा काळ बदलला नाही. मुलगा असो की मुलगी सगळ्यांना सुंदर बायको किंवा हॅन्डसम नवरा पाहिजे. पण मला वाटते सौंदर्याची देणगी निसर्ग निर्मित आहे.

आई-वडीलांच्या गुणसूत्रावर मुलांच्या चेहरेपटाची निर्मिती होते कधी कधी निसर्गाची देणगी म्हणून एखाद्याला सौंदर्य मिळते व त्याची प्रशंसाही होते. इतिहास साक्ष आहे अनेक ल ढाया आणि यु ध्द सौंदर्यवतींच्या प्राप्तीसाठी झाल्या. सौंदर्याच्या जोरावर कुणाला यश मिळते तर सौंदर्य कुणासाठी घातक बनते. जर लग्नबंधनात स्वभावापेक्षा जर रंगाला महत्त्व दिलं जात असेल तर अशा साथीदाराचा संपूर्ण आयुष्यासाठी स्वीकार करावा का?

हा प्रश्न महिलांना पडायलाच हवा. फॅशन इंडस्ट्रीने आपल्यासारख्या तरुणांना स्टायलिंगचं एवढं वेड लावलंय की, की सर्वाना सुंदर बायको हवी… चित्रपटातील सिनेतारका, नट्या पाहून तरूणांना नुसते सौंदर्याचे वेड लागले आहे. काही ठिकाणीतर लग्नानंतरही पुरुष बायकोस टोमणे मारतात. ‘मला ही पसंत नव्हती आई वडीलांच्या आग्रहास्तव मी या मुलीशी लग्न केलं.

असे संवाद बायको समोर करताना ऐकले आणि पाहिले आहेत. शाळेत लहानपणापासूनच मुलींच्या मनात सुंदर आणि कुरुप याचा भेद कळायला लागतो. घरच्या वातावरणात दोन मुली असतील आणि त्यातली एक सावळी असेल तर लागलीच तिची तुलना व्हायला लागते. स्वत:ची आई किंवा कुटुंबातील व्यक्ती आपल्याच मुलीमध्ये भेद करतात.

ती खूप सुंदर आहे, ती काळी आहे असे संवाद घालतात अशामुळे बालमनातच सुंदर मुलींसाठी राग आणि द्वेष भावना निर्माण होते. मुलींच्या लग्नाची वेळ येते तेव्हा सावळ्या मुलींना पाहुणे मंडळी तिच्यासमोरच रिजेक्ट करतात. एखाद्या प्रदर्शना प्रमाणे मुलगा पाहून तिला रिजेक्ट करतो काही ठिकाणी मुलगी सुंदर नसेल तर हुंडा जास्त द्यावा लागतो.

पैसे आणि सोने याच्या लालचाने समोरचा मुलगा तिच्या सोबत विवाह तर करतोच पण आपण त्या मुलीवर लग्न नसून उपकार केले आहेत अशी भाषा करतात. लग्नानंतर सावळी मुलगी आईवर गेली असे टोमणेही मा रले जातात. पण गुणवत्ता आणि टॅलेंटवर मुलींना निवडणा-यांची संख्या खुप कमी आहे. ऑफीस कार्यालय असो की कॉलेज सुुंदर तरूणींची वहा वहा करणारे अनेक असतात. एका गोड स्माईलवर काम करणा-यांची संख्या भरमसाठ आहे.


 
यातूनच आपल्या सौंदर्याचा गैर फा यदा घेणाऱ्याही खूप आहेत पण सौंदर्याला संस्काराची जोड असेल तर ती महिला सर्वात नशीबवान आहे. सुंदर चेहरा नसला तरी चालतो पण सुंदर मन असावे. मन पवित्र असेल तर जी वन पवित्र आहे. बाहेरच्या सौंदर्यापेक्षा मनातले सौंदर्य ओळखणारे कमी असतात जो मनुष्य निर्मळ मनाची साथीदार शोधतो तो सर्वात यशस्वी असतो. कारण कोळश्याच्या खाणीतच मौल्यवान हिरा सापडत असतो.

तरूण असो की तरूणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, सौंदर्य हे नश्वर आहे, त्याला कुठल्यातरी आजाराची कीड लागली की महत्व उरत नाही पण सौंदर्यापेक्षा सांमजस्य आणि संस्कार हे कायम असतात आणि हेच आपल्या आयुष्याची मुल्यान भेट असतात.

          - मोहन उगले


 

श्रीमंत डब्यातील गरीब माणसे.......

  श्रीमंत डब्यातील गरीब माणसे....... AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव............ आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमल...