शुक्रवार, जुलाई 05, 2024

श्रीमंत डब्यातील गरीब माणसे.......

 

श्रीमंत डब्यातील गरीब माणसे.......

AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव............

आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमलेला पोरगा आला. त्याने पाणी आणून दिले. उशी आणून दिली.. रेल्वेने AC डब्याच्या दिमतीला नेमलेला हा पोरगा मनापासून कामे करीत होता. डब्यात गर्दी नसल्याने जेवणवाला आला नाही. त्याने खाली उतरून खाद्यपदार्थ ही आणून दिले. त्याला खायला बोलावलं तरी येईना, बळेच बसवले.. एकत्र खाताना सहज त्याची चौकशी केली. तेव्हा त्या थंड वातावरणात ही उकडू लागले.


तो भोपाळचा. दर सोमवारी या रेल्वेसोबत येणार आणि आठवडा संपला की एक दिवसासाठी घरी जाणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवड्यासाठी रेल्वेत पुन्हा दाखल. रेल्वे हेच त्याचे घर होते. इथपर्यंत ठीक होते पण पुढे त्याने जे सांगितले ते फारच वेदनादायक होते. मी त्याला विचारले की आठवडाभर या २४ तास duty चा पगार किती? त्याचा चेहरा उदास झाला. तो म्हणाला “कोणता सांगू l?” मी विचारले “म्हणजे?”. तो म्हणाला “कागदावर आमची २०,००० रुपयेवर सही घेतात आणि प्रत्यक्षात फक्त ५००० रुपये देतात“ प्रवासात असताना फक्त २०० रुपये रोज मिळतो. त्या २०० रुपयात दिवसाचा चहा, नाश्ता आणि जेवण भागवायचे. काहीच परवडत नाही. पैसे वाचवायचे म्हणून घरून पोळ्या घेवून येतो. त्याच दोन दिवस खातो. आणि उरलेले दिवस वडा पाव खाऊन राहतो. मला त्याच्या नजरेला नजरच देता येईना.


तो वेदनेने म्हणाला “साहेब, अहो या रेल्वेत फक्त driver नोकरीत कायम आहे आणि सगळे सगळे आता तात्पुरते आहेत. overtime मिळतो पण ते आम्हाला नेमणारा आमचा मुकादम घेतो. त्यामुळे आम्हाला फक्त २०० रुपये रोजच मिळतो. मी सुन्न झालो. तो म्हणाला भोपालमध्ये आम्ही असे २००० लोक आहोत. पण संघटना केली की ते कामावरून काढून टाकतात." 


मी उतरताना तो हसला. दिलेले पैसे घेत म्हणाला साहेब अजून सगळ्यात climax तर सांगायचाच राहिला. मी विचारले कोणता? तो म्हणाला “प्रवासी उतरताना चोरी करतात. जेव्हा प्रवासी छोटा टॉवेल घेवून जातात तेव्हा आमचे ५० रुपये, बेडशीट नेतात तेव्हा २०० रुपये आणि पांघरूण चोरी जाते तेव्हा १००० रुपये कापून घेतात. आठवड्यातून एक दोन घटना होत्तातच. डोळ्यासमोर दिसते पण या शरीफ लोकांना बोलू शकत नाही ते शिव्या देतात... मी सुन्न झालो. त्याचा फोटो काढला म्हटले लिहितो तुझ्यावर . तो हात जोडून म्हणाला “नका टाकू माझा फोटो, मालकाने बघितले तर काढून टाकील.“ मी म्हणालो “अरे मी मराठीत लिहीन तुझा मालक हिंदी वाचतो. तो म्हणाला “ वो कुछ भी कर सकता है." मालकाविषयीची ही तीव्र भीती असेल तर हा कधी संघर्ष करणार होता ? कंत्राटीकरणाचा भेसूर चेहरा त्याच्या चेहऱ्यात मी बघत होतो.. श्रीमन्त डब्यातील ही गरीब माणसे... कोणाच्याच खिजगणतीत नाहीत.


खाजगीकरन पाहिजे ना हे एकदा नक्की वाचा. असेच सगळ्याच आफिसचे आहे. हा काही बोटावर मोजन्या इतके कर्मचारी खूप शिकले असल्याने साहेब झाले पण ते एकदम कमी प्रमाणात आहेत. पण करोडो शिकलेल्या विद्यार्थ्यांना खाजगीकरणाचा चांगलाच फटका बसला आहे व पुढे ही फटका बसणार आहे.😢😞



शुक्रवार, जून 21, 2024

वट पौर्णिमा

 

  


हिंदू धर्मात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण आवर्जून साजरा केला जातो. यातील प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांना समर्पित असतो. म्हणूनच प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्ट्य असते. त्यातीलच एक सण म्हणजे वटपौर्णिमा होय. 

वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय खास असतो. यादिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजापाठ आणि व्रत करते. 

हिंदू शास्त्रानुसार ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा असते त्यालाच वट पौर्णिमा असे संबोधले जाते. विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात या सणाचे प्रचंड महत्व आहे. यादिवशी स्त्रिया अतिशय सुंदर असा साजशृंगार करुन एका नववधूप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करतात. विशेष म्हणजे स्त्रिया यादिवशी मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा करतात. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात.


 हिंदू मान्यतेनुसार याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले होते. अध्यात्मात सत्यसावित्री ही कथा फारच प्रसिद्ध आहे. शास्त्रानुसार तीन दिवस वटपौर्णिमेचा व्रत अर्थातच उपवास केला जातो. मात्र बऱ्याच स्त्रियांना तीन दिवस व्रत करणे शक्य नसते. अशावेळी या महिला वटपौर्णिमेदिवशी व्रत ठेऊन आपल्या अखंडित सौभाग्याची प्रार्थना करतात.


वटपौर्णिमेची तारीख

यंदा २१ जून २०२४ रोजी महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. यादिवशी स्त्रिया मराठामोळ्या सौभाग्यच्या साजात नटूनथटून पूजेसाठी एकत्र जमतात. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून त्याची मनोभावाने पूजा करतात. 

हिंदू शास्त्रानुसार वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा वास असतो. त्यामुळेच या झाडाचे पूजन केल्यास या देवतांचा आशीर्वाद पती-पत्नी दोघांनाही लाभतो. देवतांच्या आशीर्वादाने  वैवाहिक आयुष्यत सुखसमृद्धी आणि आनंद प्राप्त होते.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य :

विविध शुभ साहित्यांच्या आधारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश, पंचामृत, पंचपात्र, चौरस, पाट, फुले आणि दुर्वा, हिरव्या किंवा लाल रंगाचे एक वस्त्र, तुळशीपत्र, ५ नाणी, वटसावित्री पूजेचे पुस्तक, अष्टगंध, हळदी-कुंकू, ५ फळे, खडीसाखर, गूळ, दोन खोबऱ्याचे बक्कल, १० सुपाऱ्या, २५ विड्याची पाने, तूप, २ बदाम, २ खारका, ताम्हण, दूध-साखरेचे नैवेद्य, सूतबंडल इत्यादी गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक असतात. 



वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत

वैदिक शास्त्रानुसार कोणतीही पूजा योग्य विधी आणि नियमानुसार केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो. त्यामुळेच स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजादेखील अतिशय योग्यरीत्या करायला हवी. सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करुन साजशृंगार करावा. त्यांनंतर पूजेच्या साहित्यात असणाऱ्या सुपारीच्या साहाय्याने श्री गणेशाची स्थपणा करावी. नंतर त्यावर अक्षता आणि हळदीकुंकू अपूर्ण करुन घ्यावे. त्यांनंतर सुपारीची स्थापना करत त्याची पूजा करावी. आणि ओटीसुद्धा भरुन घ्यावी.



पुढे वटवृक्षाला सात वेळा जल अर्पण करत प्रदक्षिणा घालावी. आपण घेतलेले सुत बंडल वटवृक्षाला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालावी. त्यांनंतर नियमाप्रमाणे तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. ओटी भरुन पंचामृत, नाणी, फुले, ५ फळे अर्पण करावी. तसेच वटवृक्षाला हळदी-कुंकू लावून नैवेद्य आणि आंबे अर्पण करावे. पाच विवाहितांना हळदी-कुंकू लावत त्यांची ओटी भरावी. ओटीमध्ये गहू आणि फळे घालावे. शिवाय सायंकाळच्या वेळी सुवासिनींना घेऊन सावित्रीच्या कथेचे वाचन करावे. 

-  मोहन उगले 




रविवार, फ़रवरी 04, 2024

इक तमन्ना सताती रही रात भर!!

''आप की याद आती रही रात भर'',
चाँदनी दिल दुखाती रही रात भर!!

गाह जलती हुई गाह बुझती हुई,
शम-ए-ग़म झिलमिलाती रही रात भर!!

कोई ख़ुशबू बदलती रही पैरहन,
कोई तस्वीर गाती रही रात भर!!

फिर सबा साया-ए-शाख़-ए-गुल के तले,
कोई क़िस्सा सुनाती रही रात भर!!

जो न आया उसे कोई ज़ंजीर-ए-दर,
हर सदा पर बुलाती रही रात भर!!

एक उम्मीद से दिल बहलता रहा,
इक तमन्ना सताती रही रात भर!!
   
        

श्रीमंत डब्यातील गरीब माणसे.......

  श्रीमंत डब्यातील गरीब माणसे....... AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव............ आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमल...